कमिन्स कॉलेज रस्त्यावरील अडथळा ठरणारी भिंत आणि दुकाने यांच्यावर कारवाई; वाहतूककोंडी सुटणार?

कमिन्स कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमण महापालिकेने काढले. या रस्त्यावरील सिद्धिविनायक कॉलेज ते कमिन्स कॉलेज या भागात अरुंद झालेल्या रस्त्यात अडथळा ठरणारे बांधकाम महापालिकेच्या पथ विभाग, अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभाग यांनी एकत्रित कारवाई करून काढून टाकले.

पालिकेने कारवाई करत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची सीमाभिंत तसेच काही दुकाने काढून टाकली आहे.

कमिन्स कॉलेज रस्ता हा एकीकडे कर्वे रस्ता तर दुसरीकडे राजाराम पुलाला जोडतो. हा रस्ता १२ मीटर रुंदीचा आहे. राजाराम पुलाकडून वारजे कडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा पडतो. मात्र या रस्त्यावरील वाढलेल्या अतिक्रमणांमुळे हा रस्ता अरुंद झाला होता. सिद्धिविनायक महाविद्यालय ते कमिन्स कॉलेज या टप्प्यात या रस्त्याची रुंदी केवळ आठ ते नऊ मीटर एवढी कमी झाली होती. त्यासोबतच काही मिळकतींसमोर व्यवसायिक दुकाने देखील सुरू करण्यात आली होती. या दुकानांसमोर लोक वाहने लावत. त्यामुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या होत असे.

दरम्यान, महापालिकेकडून या रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई करून काढून टाकले असून हा रस्ता मोकळा श्वास घेणार आहे. तसेच या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार असल्याचा दवा केला जात आहे.

Leave a Reply

rushi