तरुणीवर मित्राने केला धारदार शस्त्राने हल्ला, WNS कंपनीच्या पार्किंगमध्ये घडली घटना
पुणे : येरवडा पोलिस स्टेशन हद्दीतील WNS कंपनी, रामवाडी येरवडा येथील पार्किंगमध्ये आज सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. याच कंपनीत काम करणारी शुभदा शंकर कोदारे (वय २८) हिला तिच्या मित्राने धारदार हत्याराने गंभीर जखमी केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा हिचे आणि कृष्णा सत्यनारायण कनोजा यांच्यात वाद निर्माण झाला. या वादाच्या परिणामी कृष्णाने शुभदावर धारदार हत्याराने हल्ला केला आणि तिच्या उजव्या कोपरावर वार करून तिला गंभीर जखमी केले.
शुभदा हिला तात्काळ उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल, येरवडा येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि तिच्या स्थितीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
येरवडा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर संबंधित कलमानुसार कारवाई केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.