तीस वर्षीय तरूणाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या
पिंपरी-चिंचवड : 30 वर्षीय तरुणाने इंद्रायणी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना देहूगाव येथे घडली आहे. बुधवारी (दि. 25) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार समोर आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अंकुश गजानन काळोखे (वय 30, रा. देहूगाव, विठ्ठलवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. अंकुशच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही.
सविस्तर वृत्त असे की, दुपारी साडे बाराच्या सुमारास अंकुश याने देहूगाव गाथा मंदिर परिसरात इंद्रायणी नदी पात्रामध्ये नदीच्या पुलावरून उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफ च्या जवानांनी नदीपात्रात शोध घेऊन दुपारी अडीचच्या सुमारास तरूणाचा मृतदेह बाहेर काढला.शवविच्छेदनासाठी मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला.पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.