नानाच्या चाळीत भीषण आग; अठरा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी
आज सकाळी साडे दहा वाजता म्हाळुंगे, नानाची चाळ क्रमांक ४ व ५ येथे आग लागल्याची घटना घडली असता औंध अग्निशमन केंद्र, पीएमआरडीए अग्निशमन केंद्र, एमआयडीसी अग्निशमन केंद्र येथून एकुण ५ वाहने रवाना करण्यात आली होती.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, तेथे दहा बाय दहाची पञ्याचे शेड असलेली वीस घरे त्यापैंकी अठरा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसले. जवानांनी आगीवर चार ही बाजूने पाण्याचा मारा करुन सुमारे तीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवत कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवले. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. या आगीमध्ये कोणी जखमी वा जिवातहानी नाही.
सदर आगीमध्ये गृहोपयोगी साहित्य तसेच गादया, कपडे, खुर्ची, कपाटे, फर्निचर, इलेक्ट्रीक वायरिंग इत्यादी साहित्य जळाले.