नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तोंडाला बांधल्या प्लास्टीक पिशव्या
पुणे : नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना वडगाव बुद्रुक येथील रेणुका नगरी परिसरात घडली आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी बाळाचा जीव वाचवला. नवजात बाळाला असे रस्त्यावर टाकून दिल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नवजात बाळाच्या पालकांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डगाव बुद्रुक येथील रेणुका नगरी परिसरात सोमवारी रात्री बाळाचा स्थानिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. स्थानिकांनी ताबडतोब सिंहगड पोलिसांना संपर्क केला. त्या नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज येवू नये म्हणून त्याच्या तोंडावर चक्क प्लास्टिकच्या पिशवी बांधल्या होत्या. तरीही बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. सिंहगड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बाळाला ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, बाळाला सोडून पळून जाणाऱ्या व्यक्तीविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिंहगड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून नवजात बालकाच्या पालकांचा शोध सुरू केला आहे.