विमाननगरमध्ये विचित्र अपघात; पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली

पुणे: विमाननगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

शुभ अपार्टमेंट येथे रविवारी सकाळी 10 वाजता हा अपघात घडला. पार्किंगमध्ये कार पुढे नेण्याच्या प्रयत्नात चालकाने चुकून मागे घेतली असता कार इमारतीच्या भिंतीला धडकली आणि खाली कोसळली. या घटनेत कोणालाही गंभीर इजा झाली नाही.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काळ्या रंगाची होंडा सिटी कार भिंत तोडून खाली पडताना दिसत आहे. भिंत कमकुवत असल्यामुळे ती कारच्या धडकेने तुटली आणि कार उलट दिशेने खाली पडली. सुदैवाने कारचा वेग कमी असल्यामुळे मोठा अपघात टळला.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. खाली कोणतीही व्यक्ती नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत असून, सुरक्षित पार्किंग व्यवस्थेवर चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

rushi