कसबा गणपती मंदिराजवळ व्यवसायिकावर तीक्ष्ण हत्याराने वार

पुणे: कसबा गणपती मंदिराजवळ किरकोळ वादातून दुचाकीस्वार व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी भवानी पेठ येथील रहिवासी योगेश गोपाळजी ठक्कर (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२६ जानेवारी) ठक्कर कसबा गणपती मंदिराजवळ दुचाकी लावण्यासाठी जागा शोधत असताना हा प्रकार घडला. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी ठक्कर यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि नीट गाडी चालव असं म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याच दरम्यान, ठक्कर यांच्या पाठीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केला आणि दोघे घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी करत आहेत.

Leave a Reply

rushi