नऱ्हे गावात दुचाकीस्वार पडला ड्रेनेजच्या खड्ड्यात
पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या नऱ्हे गावात ड्रेनेजच्या कामासाठी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. त्यामुळे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत एक दुचाकीस्वार खोदकामाजवळून जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी उलटली आणि संबंधित व्यक्ती दुचाकीसह ड्रेनेजमध्ये पडला. या घटनेत दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला आणि गाडीला ड्रेनेजमधून बाहेर काढण्यात आले. नऱ्हेतील ड्रेनेज लाईनसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहितेमुळे काम ठप्प झाले होते.