सीएनजीच्या दरात १.१० रुपयांची वाढ, पुणेकरांच्या खिशाला कात्री
पुणे: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ‘सीएनजी’च्या दरात वाढ केली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.१० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार असून महागाईच्या वाढत्या झळा सोसाव्या लागत आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ‘सीएनजी’च्या दरात प्रतिकिलो १.१० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. नवीन शनिवार मध्यरात्रीपासून हे दर लागू झाले असून पुणे आणि परिसरात दर ८९ रुपये प्रतिकिलो रुपये प्रतिकिलो झाला आहे. या दरवाढीमुळे ‘सीएनजी’वर धावणाऱ्या वाहनांच्या खर्चात वाढ झाली आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये सीएनजी दरवाढीचा दणका बसला आहे. सीएनजीचा दर आता प्रतिकिलो सीएनजी दर आता प्रतिकिलो ८९ रुपयांवर पोहोचला आहे. आयात नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली झपाट्याने वाढ आणि बाजारातील दरांवर आधारित पुरवठा याचं संतुलन करण्याचं मोठं आव्हान एमएनजीएल समोर असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या वाढीमध्ये उत्पादन शुल्क आणि राज्य व्हॅटचा समावेश असेल, जे एकूण वाढी पैकी सुमारे १५ टक्के आहे.
पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये सीएनजी दरवाढीचा दणका बसला आहे. सीएनजीचा दर आता प्रतिकिलो ८९ रुपये झाला असला तरी त्यातून पुण्यातील मोटारचालकांची पेट्रोलच्या तुलनेत ४९ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत २७ टक्के बचत होत असून रिक्षाचालकांची २९ टक्के बचत होत आहे, असे कंपनीने सप्टेबरमधील दरवाढीवेळी म्हटले होते. यावर्षी जुलै महिन्यातही सीएनजीचे दर वाढले होते. सध्या इंधनाचे दर वाढले असून पेट्रोल आणि डिझेल महागल्याने वाहनचालक पर्यावरणपूरक सीएनजीला पसंती देत आहेत. मात्र, आता सीएनजीचे दरही वाढू लागले आहेत. पुण्यात जुलैमध्ये सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सीएनजीचा दर त्यावेळी प्रतिकिलो ८५ रुपयांवर पोहोचला होता. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनाचालकांच्या खिशाला झळ बसत आहे.