पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करणारा एसीबीच्या जाळ्यात

पुणे: सहाय्यक पोलीस निरीक्षकाला दोन हजार रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला गेला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हसनअली गुलाब बारटक्के (वय, ४५, रा. ताडीवाला रोड) असे आरोपीचे नाव आहे. साहेब पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

आरोपी हसन अली गुलाब बारटक्के याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम हे करत आहेत. कदम यांनी आपल्याला गुन्ह्यात मदत करावी यासाठी बारटक्के वारंवार त्यांना लाच देण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान कदम यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

गुरुवारी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या परिसरात हसन अली याला पोलीस अधिकारी कदम यांना आज देण्याचा प्रयत्न करत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

Leave a Reply

rushi