गौतमी पाटील चक्क पुणे पुस्तक महोत्सवात; सांगितलं कोणतं पुस्तक वाचणार

नृत्याने सर्वांना भुरळ घालणारी गौतमी पाटील आता पुस्तक महोत्सवात दिसली. तिला पाहून सर्वचजण चकित झाले. आपल्या नृत्यकला आणि अदाकारीसाठी प्रसिद्ध असलेली गौतमी थेट पुणे पुस्तक महोत्सवाला आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. नेहमी नृत्य सादर करणारी मी इथे वाचण्यासाठी आली असल्याचे तिने सांगितले.

गौतमीने संवाद साधताना सांगितले की, ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एक पुस्तक वाचणार आहे. तिच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली. यावेळी, प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नीने गौतमी पाटीलला काही पुस्तके भेट दिली. यावेळी प्रवीण तरडे यांनी गौतमी पाटीलला अण्णाभाऊ साठे यांची फकिरा ही कादंबरी भेट देणार असल्याची घोषणा केली.

गौतमी पाटील म्हणाली, इतर ठिकाणी मला नाचण्यासाठी बोलावतात, पण इथे मला पुस्तक वाचण्यासाठी बोलावले आहे. पुण्यात इतका मोठा पुस्तक महोत्सव भरला आहे. यापुढे मी माझ्या मोकळ्या वेळेत पुस्तक वाचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. प्रवीण तरडे माझ्यासाठी पुस्तक निवडून देणार आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार. या महोत्सवामुळे मला नवीन विचार आणि प्रेरणा मिळेल.

तिने पुढे सांगितले, लहानपणापासून मी नृत्य करत आहे. त्यामुळे पुस्तक वाचण्याची संधी मिळाली नाही. पण आता नक्कीच मी पुस्तक वाचणार आहे. सर्वांना पुस्तक वाचण्याची शिफारस करते. प्रवीण तरडे जे पुस्तक सुचवतील, ते मी वाचणार आहे. त्यात एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेले पुस्तक आहे. जे मी वाचणार आहे.”

Leave a Reply

rushi