ताम्हिणी घाटात खाजगी बसला अपघात; ५ जणांचा मृत्यू, २७ जखमी

रायगड: माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर भीषण बस अपघात झाला. पर्पल(Purple) ट्रॅव्हल्सची खाजगी बस (क्रमांक MH14GU3405) पलटी होऊन ५ जणांचा मृत्यू झाला असून २७ प्रवासी जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये २ पुरुष व ३ महिलांचा समावेश आहे.

ही दुर्दैवी घटना आज सकाळी ९.३० ते ९.५० दरम्यान घडली. लोहगाव, पुणे येथील जाधव कुटुंबीय बिरवाडी, महाड येथे लग्नसमारंभासाठी जात असताना हा अपघात झाला. घाटातील तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली.

अपघातानंतर बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या नेतृत्वाखाली या घटनेची तपासणी सुरू आहे.

या अपघातात संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव आणि एक अनोळखी पुरुष (ओळख पटवण्याचे काम सुरू आहे) यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

rushi