आर्म्स अॅक्टच्या गुन्ह्यातील आरोपीला सापळा रचून पकडले; गुन्हे शाखेची कारवाई

पुणे: दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला युनिट सहाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. रेहान नझीर कुरेशी (वय ३४, रा. लिंबोनी बाग, इंद्रानगर, मोहरम जियाज मार्क रोड, गोवंडी, मुंबई ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिलेल्या महितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी युनिट सहाच्या पथकाने साहिल राजु शेख (वय २४) व जैद जावेद खान (वय २२) यांच्याकडून तीन अग्निशस्त्रे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२४३/२०२४ आर्म्स अॅक्ट कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(अ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून केला जात होता. तपासादरम्यान रेहान नझीर कुरेशी हा देखील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांकडून त्याचा तपास सुरू होता.

बुधवारी, १८ डिसेंबरला युनिट सहाच्या पथकाला कुरेशीबद्दल गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक दळवी आणि त्यांच्या पथकाने आरोपी कुरेशी याला हडपसर परिसरातील सय्यदनगर येथून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पठाण, सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक दळवी, पो.हवा. सकटे, मेमाणे, मुंढे, कारखेले, पो.अं. ताकवणे , पवार, व्यवहारे, काटे, डोंगरे, काटे, धाडगे, तनपुरे, पो.हवा. तांबेकर, मपोअं. पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली.

Leave a Reply

rushi