पुणे पुस्तक महोत्सवात उलगडली रिक्षात विसरलेल्या ‘अनमोल ठेवा’ची गोष्ट

अनेक वेळा रिक्षाचालकांच्या चांगुलपणाचा अनुभव लोकांना येत असतो. असाच अनुभव पुणे पुस्तक महोत्सवादरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाला आला आहे.

पुणे पुस्तक महोत्सवातून एक ज्येष्ठ नागरिक रिक्षातून घरी परतले. आयुष्यभराचा ‘अनमोल ठेवा’ असलेली त्यांची पिशवी रिक्षात विसरून राहिली. काही वेळाने रिक्षाचालकाने त्यांना फोन केला. त्यांची पिशवी रिक्षात विसरून राहिली असल्याचे चालकाने ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. पिशवीत जाहिरातीसारखे पत्र होते. त्यावर मोबाइल नंबर होता. या नंबरवरून त्यांना फोन केला असे रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. दुसऱ्या दिवशी तो ‘अनमोल ठेवा’ रिक्षाचालकाने पुणे पुस्तक महोत्सवाच्या गेटवर परत केला. आपल्या आयुष्यभराचा ठेवा परत मिळाला म्हणून ज्येष्ठ नागरिकचा कंठ दाटून आला. ते आपले रडू कसेबसे आवरत होते.

या सगळ्या गडबडीत ते ज्येष्ठ पुन्हा पुणे पुस्तक महोत्सवाकडे जाऊ लागले. अचानक आपला मोबाइल फोन रिक्षात राहिल्याचे त्यांच्या ध्यानात आहे. यावेळी गेटवर उपस्थित असलेल्या पोलीस उपनिरीक्षक राजेश लोणकर, सुभाष सुद्रिक व इतरांनी त्यांच्या मोबाईलवर कॉल केले. रिक्षाचालक युनुस पठाण यांनी त्यांचा फोन उचलला. पठाण परत आले आणि त्यांनी तो मोबाइल फोन परत केला.

आपल्या या ‘अनमोल ठेवा’ बद्दल बोलताना सतीश पेंढारकर (वय ७४) यांनी सांगितले की ते २६ -२७ वर्षाचे असल्यापासून मराठीतील ज्येष्ठ लेखक, साहित्यिक, कवी यांच्याशी संपर्क साधत आले आहेत. त्यांचे संदेश आणि सह्या घेत आले आहेत. जवळपास १०० हून अधिक साहित्यिकांचे संदेश व सह्या यांचा संग्रह त्यांनी केला आहे. त्यातील ५२ नामवंताचे सही, संदेश लॅमिनेशन करुन ठेवले आहे. या सह्या आणि संदेशांचे प्रदर्शन ते शाळांमध्ये घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. या लेखकांबद्दल ते लोकांना माहिती देतात. मुलांमध्ये मराठी साहित्यिकांविषयीची जिज्ञासा वाढेल यासाठी ते प्रयत्न करतात. पुणे पुस्तक महोत्सवात गेली ६ दिवस हे प्रदर्शन भरवित आहे. इतरांच्या दृष्टीने या फक्त सह्या असतील त्यांच्या आयुष्यातील हा ‘अनमोल ठेवा’ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा हाच ‘अनमोल ठेवा’ रिक्षाचालकाने स्वत:हून परत आणून दिल्याने ते आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले

Leave a Reply

rushi