डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; नगर रस्त्यावर घडली घटना

नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रजीत निवृत्ती सरडे (वय ५८, रा. उबाळेनगर, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत सरडे यांचा मुलगा समाधान (वय २०) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी डंपर चालक राजू पांडू चव्हाण (वय २४, रा. सुयोगनगर, भावडी रस्ता, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत सरडे यांचा दुध विक्रीचा व्यवसाय होता. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ते सोसायटीत दूध विक्री करून घरी परत जात होते. वाघोलीतील उबाळेनगर परिसरात त्यांना भरधाव डंपरने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सरडे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

rushi