पोलीस उपायुक्त आर. राजा यांची बदली, डीसीपी तेजस्वी सातपुते यांची शस्त्र निरीक्षण शाखेत नियुक्ती

गृहविभागाने शुक्रवारी (ता. १३) आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा यांची बदली पोलिस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागात करण्यात आली आहे.

तर पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची शस्त्र निरीक्षण शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली होती. मात्र त्याचवेळी ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची देखील बदली करण्यात आली होती. देशमुख यांच्या जागी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची ऐन गणपती उत्सवाच्या दरम्यान बदली झाली होती. मात्र या बदलीविरोधात देशमुख यांनी ‘कॅट’ मध्ये धाव घेतली. देशमुख यांच्या बदलीला स्थगिती दिली मिळाली आहे. त्यामुळे संदिपसिंह गिल व तेजस्वी सातपुते यांची बदली होऊनही त्यांना पदावरून सोडण्यात आले नव्हते.

त्यानंतर पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची शस्त्र निरीक्षण शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच उपायुक्त आर. राजा यांची बदली पोलिस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागात करण्यात आली आहे.

Leave a Reply

rushi