पीएमपी बसमध्ये तरुणीसोबत अश्लील कृत्य, तरूणावर गुन्हा दाखल

प्रवासी तरुणीशी पीएमपी बस मध्ये तरुणाने अश्लील कृत्य केल्याची घटना शंकरशेठ रस्ता परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका तरुणीने खडक पोलीस ठण्यात फिर्याद दिली असून एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार सुधीर खाटमोडे (वय ३४, रा. नारायण पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत पीएमपी बस मधून प्रवास करत होती. त्यावेळी आरोपी तुषार खाटमोडे याने तरुणीसोबत अश्लील कृत्य केले. यावेळी फिर्यादी तरुणी आणि तिच्या मैत्रिणीने खाटमोडे याला प्रतिकार केला. तसेच दोघींनी त्याला जाब विचारला. मात्र प्रतिकार झाल्यावर तो घाबरायला. बसून मधून पळून जावू लागला. त्यावेळी झालेल्या झटापटीत दोण तरुणींनी त्याच्या गळ्यातले ओळखपत्र हिसकावून घेतले. या ओळखपत्रावर खाटमोडे याचे नाव,मोबाइल क्रमांक अशी माहिती होती.

तरुणीने खाटमोडे याच्याशी मोबाइलवर संपर्क केला. तेव्हा त्याने तरुणीला धमकावले. तसेच तक्रार केल्यास तुला सोडणार नाही असे म्हणत त्याने तरुणीला शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे करत आहे.

Leave a Reply

rushi