पुण्यातील संतापजनक प्रकार! अल्पवयीन मुलीला गच्चीवर घेऊन गेला अन्…
पुणे : शिकवणीसाठी आलेल्या आठ वर्षीय शाळकरी मुलीशी अल्पवयीन मुलाने अश्लील कृत्य केल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे.शिक्षिकेच्या १४ वर्षीय चुलतभावाने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
याप्रकरी पिडित मुलीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखले केली. या तक्रारीवरून पोलीसांनी १४ वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची आठ वर्षांची मुलगी येरवडा येथील एका महिलेकडे खासगी शिकवणीसाठी जात होती. शिक्षिकेचा १४ वर्षीय चुलतभाऊ तेथे राहायला आहे. आठवड्यापूर्वी शिक्षिका घरी नव्हती. तेव्हा मुलाने मुलीला गच्चीवर नेऊन मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलगी दोन दिवसांपूर्वी शिकवणीसाठी घरी आली. तेव्हाही शिक्षिका घरी नव्हती. त्यावेळी मुलाने मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने पोलीसात धाव घेतली. पोलीसांनी केलेल्या चौकशीत शिक्षिकेच्या १४ वर्षीय चुलतभावाने मुलीबरोबर दोनदा अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावरून १४ वर्षीय मुलाविरुद्ध पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.