पुण्यातून मंत्रिमंडळाची लॉटरी कोणाला ?
माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, चंद्रकांत पाटील, सुनील कांबळे, चेतन तुपेपाटील यांची नावे चर्चेत
आता लवकरच मुख्यमंत्री पदाचा कारभार जाहीर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चार वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, चंद्रकांत पाटील, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपेपाटील यांची मंत्रिमंडळासाठी नावे चर्चेत आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने यांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची(Pune) शक्यता आहे.
5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अभूतपूर्व असे यश मिळाले होते. आता महायुतीला मतदारांनी भरघोस मते दिली. यामध्ये चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान निश्चित मानले जात आहे. तर, दुसरीकडे मिसाळ आणि तापकीर यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. हे दोघेही 4 – 4 वेळा निवडून आले आहेत.
वडगांवशेरी मतदारसंघात सुनील टिंगरे यांना संधी देऊन जगदीश मुळीक यांना विधान परिषदेवर घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मुळीक यांनाही मंत्रिमंडळाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. येन विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांनी तुतारी फुंकत विजय मिळविला. त्यांना आता 5 वर्ष विरोधात काम काम करावे लागणार आहे.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात जागा दिली जाते, याची उत्सुकता लागली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पहिल्या टप्प्यातच लॉटरी लागली. तशी त्यांच्यावर जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. ती त्यांनी पूर्ण केली. आता लवकरच पुणे महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश भाजपकडून देण्यात (Pune) आले आहे.