तडीपार गुन्हेगाराच्या खंडणी विरोधी पथक एकने आवळल्या मुसक्या
पुणे शहराच्या खंडणी विरोधी पथक एकने कारवाई करत तडीपार गुन्हेगारास ताब्यात घेतले. मुसा उर्फ मुसेफ वजीर थोरपे (वय २२ रा. नूरमौहल्ला गल्ली, दिघी रोड, भोसरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे . थोरपे याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.
खंडणी विरोधी पथक एकची टीम फरारी तसेच पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोध घेत होती. पोलीस हवालदार अमोल आव्हाड आणि पोलीस अंमलदार मयूर भोकरे यांना बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत भोसरी पोलीस स्टेशन मधील तडीपार मुसा थोरपे हा गुंड विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील बैजू हॉटेलसमोर शास्त्री रोड पानटपरीच्या शेजारी आढळला आहे.
यावरून ताबडतोब कारवाई करत खंडणी विरोधी पथक एकने त्या ठिकाणी जाऊन मुसा थोरपे याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्याची ओळख पटवून त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (गुन्हे), पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एक , गुन्हे शाखा पुणे यांच्याकडील पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस फौजदार रवींद्र फुलपगारे, पोलीस हवालदार अमोल आव्हाड, पोलीस हवालदार लहू सूर्यवंशी यांनी केली.