सीमाशुल्क विभागाने जप्त केलेले ६ हजार किलो अमली पदार्थ नष्ट

सीमाशुल्क विभागाने जप्त केलेले ६ हजार किलो अमली पदार्थ नष्ट

पुणे: सीमाशुल्क (कस्टम) विभागाने विविध कारवाईत जप्त केलेल्या ६ हजार किलो अमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो लिमिटेड या खाजगी कंपनीच्या च्या भट्टीत हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या कारवाईदरम्यान अमली पदार्थ तस्करीसंबंधी १४ गुन्हे दाखल करण्यात आले होते, तसेच २३ जणांना अटक करण्यात आली होती.

कस्टम विभागाच्या पथकाने १५५२ किलो गांजा, २७९ किलो चरस, तसेच मेफेड्रोन आणि कोकेन यासारख्या अमली पदार्थांचा समावेश असलेले ६ हजार किलो पदार्थ जप्त केले होते. हे पदार्थ नष्ट करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती.

कस्टमच्या पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो.

Leave a Reply

rushi