दुर्गा टेकडी वरील झाडांचा बळी ?
शहरात झाडांच्या लाकडाच्या हव्यासापोटी आणि काही हौशी पर्यावरण प्रेमींच्या हट्टापोटी आहे ती झाडं तोडुन छोटी झाडं लावण्याचा प्रकार दुर्गा टेकडीवर सुरू आहे.
ही विदेशी ही अपायकारक असे प्रमाणपत्र अभ्यास नसलेले पर्यावरण प्रेमीच देतात आणि प्रशासनाला गळ घालून झाड तोडून घेतात.
शहरात जागा संपल्या की काय की एका हरित टेकडी वरील मोठी पूर्ण वाढ झालेली झाडं तोडून छोटी झाडं लावली जात आहे.
विदेशी झाडं अपायकारक असतात असा निष्कर्ष काढून कुणी वृक्षतोड करत असेल तर शहरातील बहुतांश झाड तोडून टाकावी लागतील आणि आधीच संधीच्या शोधत असलेले पालिका कर्मचारी व लाकुड माफिया यांना तर ही आयती संधीच आहे.
दुर्गा टेकडी हा एक संवेदशील भाग आहे तेथील अशी वृक्षतोड टेकडीच्या दृष्टीने धोकादायक आहे. एकदम झालेल्या वृक्षतोडीमुळे टेकडी उजाड आणि जमिनीची धूप होऊ शकते.
हे सगळ सुरू असताना टेकडीवर येणारे एक दोन पर्यावरण प्रेमी सोडून हजारो लोक आणि तथाकथित पर्यावरण प्रेमी का गप्प आहे ????
प्रशांत राऊळ
ग्रीन आर्मी
9881880029