शासन आदेशाच्या प्रतीक्षेत प्राध्यापकाचे पुण्यात उपोषण
घंटा वाजवत आंदोलन सुरू
जर दिलीप ठोंब्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर प्राध्यापक संघटना पेपरवर बहिष्कार टाकेल असा इशारा संघटनेने दिला आहे..
अँकर पूर्णवेळ वेतन निश्चितीच्या मागणीसाठी व पूर्णवेळ वेतन मिळावे या मागणीसाठी कुटुंबासह उपोषण केल्यानंतर संघटनेचे पदाधिकारी आणि मा. संचालक यांच्यात झालेल्या चर्चेनुसार उपोषण स्थगित करून मा. शिक्षणमंत्री यांच्याबरोबर मुंबई येथे झालेल्या बैठकीत मंत्रिमहोदयांनी ०८ दिवसात या प्रश्नाबाबत कार्यवाही करावी असे आदेश उच्च शिक्षण विभागाला दिले होते. त्यानंतर मा. विभागीय सहसंचालक,उच्च शिक्षण, आणि मा. संचालक,उच्च शिक्षण, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवाजीनगर,पुणे यांनी उपोषणकर्ते प्रा. दिलीप ठोंबे यांच्या इतिहास प्राध्यापक पदाच्या पूर्णवेळ वेतननिश्चितीच्या मान्यतेसाठी शासनाकडे मंत्रालयात प्रस्ताव पाठविला. मंत्रालयात जाऊन उपसचिव, अवर सचिव, उच्च शिक्षण यांची भेट घेऊन मा. संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांना शासनाकडून प्रा. दिलीप ठोंबे यांच्या पूर्णवेळ वेतननिश्चिती मान्यतेबाबत त्वरित आदेश व्हावा अशी विनंती केली मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही. दोन महिन्यांनी सेवानिवृत्ती असल्याने या प्रस्तावाला मंत्रालयातून तात्काळ मान्यता मिळावी यासाठी प्रा. दिलीप ठोंबे कुटुंबासह मा. संचालक, उच्च शिक्षण, शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, शिवाजीनगर, पुणे या कार्यालयासमोर पुन्हा उपोषण करीत आहेत. घंटा वाजवत बनयन वर त्यांनी आंदोलन सुरू केला आहे.