सिडकोत भर दिवसा ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लाखो रुपयांचे सोनं लुटल्याने एकच खळबळ

नाशिकच्या सिडकोतील माऊली लॉन्स महालक्ष्मी नगर या ठिकाणी श्री या ज्वेलर्स या दुकानावर भर दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की, श्री ज्वेलर्स या दुकानाचे मालक घोडके व त्यांची पत्नी हे दुकानात बसलेले असताना दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी घोडके यांना बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पसार झाले. भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी दरोडा पडल्याने सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस घटना समजतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह संपूर्ण पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. भर दिवसा दरोडा पडल्याने परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. या दिवसात झालेल्या लुटीवर आता पोलीस काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

rushi