महिलांचा निर्धार, राहुल दादाच आमदार सुप्रिया सुळे यांच्यासह महिला कार्यकर्त्या आणि मतदारांचा निर्धार
विकासाची चाहूल, निवडा फक्त राहुल, सुळेंचे आवाहन
चिंचवड, ता. ११ : चिंचवड मतदारसंघात महिला मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे यंदा महिला मतदार चिंचवडचा आमदार ठरविण्यात निर्नायकी भूमिका बजावतील आणि महिला मतदार विकासाची भूमिका मांडणाऱ्या राहुल कलाटे यांना साथ देतील अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यक्त केल्या. सुळे यांनी सोमवारी (ता. ११) चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या कार्यालयाला भेट देऊन सोसायटी धारकांसोबत संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.
चिंचवड मतदारसंघात शहरीकरण वाढते आहे. पण, त्याप्रमाणे महिला आरोग्य आणि सुरक्षितता यांच्यासाठी कोणतेही ठोस काम सत्ताधाऱ्यांनी केलेले नाही. हेच आम्ही मतदारसंघातील महिला मतदारांना समजावून सांगत आहोत आणि त्याला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळतो आहे अशी भावना महिला पदाधिकाऱ्यांनी सुळे यांच्याकडे मांडली. सोसायटीधारकांनी आपल्या पाणी, वीज, रस्ते अशा समस्या सुळे यांच्यासमोर मांडल्या. त्यांच्या सर्व प्रश्नांना सुळे यांनी ऐकून घेतले आणि महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सुळे यांनी देत आता विकासाची चाहूल निवडा फक्त राहुल असे आवाहन नागरिकांना केले.
चिंचवडमध्ये गेली १२ वर्षे आम्ही रहात आहोत. शहर वाढले पण त्याप्रमाणात सुविधा आलेल्या नाहीत. त्यामुळे यावेळी आमचे आरोग्य, सुरक्षितता, स्वावलंबन याला महत्व देणाऱ्या राहुल दादांना साथ देऊन परिवर्तन घडवणार असा निर्धार महिलांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात केलेला आहे. –
– ज्योती निंबाळकर
महिला शहर अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षमतदारसंघात मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. महागाईचा प्रश्न खूप गंभीर आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या वर्गातील महिलांशी संवाद साधतांना या प्रश्नाची प्रकर्षाने जाणीव होते. महिलांच्या आरोग्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यातूनच कॅन्सर जनजागृती अभियानासारखे उपक्रम आम्ही राबवले आहेत.
– राहुल कलाटे,
उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (महाविकास आघाडी)
जयंत पाटील यांची आज सभा
महाविकास आघाडी आणि पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा आज (ता. १२) संध्याकाळी पाच वाजता, विमल गार्डन, रहाटणी येथे होणार आहे. सर्वांनी बहुसंख्येने सभेला उपस्थित रहावे अशी विनंती पक्ष आणि उमेदवार यांच्यातर्फे करण्यात आली आहे. एरवी सर्वांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणारे जयंत पाटील पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा चिंचवडमध्ये येणार आहेत त्यामुळे त्यांचा सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.