डिजिटल अरेस्टची भीती दाखवून महिलेला १३ लाखांना गंडवले

पुणे : काळ्या पैशांच्या व्यवहारात डिजिटल अरेस्टच्या कारवाईची भीती दाखवून एका महिलेची १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना शहरातील पाषाण भागात घडली. या प्रकरणी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी महिला या पाषाण परिसरात राहतात. २ जानेवारी रोजी महिलेच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. मुंबई गुन्हे शाखेकडून काळ्या पैशाच्या प्रकरणात कारवाई करण्यात येणार आहे. फिर्यादी महिलेच्या बँक खात्याचा या काळ्या पैशांच्या व्यवहारात वापर करण्यात आला आहे, असे त्यांनी माहीलेला सांगितले. तसेच महिलेला डिजिटल अरेस्ट होवू शकते अशी भीती चोरट्यांनी महिलेला घातली. अटक टाळण्यासाठी चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे टाकण्यास सांगितले. घाबरून जावून महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात १३ लाख २३ हजार रुपये जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप तपास करत आहे.

Leave a Reply

rushi