पहाटेच्या सुमारास कोंढव्यामध्ये इमारतीत आग; सुदैवाने जखमी नाही

पुणे – दिनांक १३•०१•२०२५ रोजी पहाटे ०३•३२ वाजता कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, नताशा एनक्लेव्ह या चार मजली इमारतीत एका दुचाकी वाहनाला आग लागल्याची वर्दि मिळताच कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सदर ठिकाणी दुचाकीने पेट घेतला असून त्याचबरोबर इमारतीत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये असणाऱ्या घरगुती वापराच्या काही वस्तुंमुळे आग मोठ्या स्वरूपात पसरली आहे. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून प्रथम इमारतीत कोणी रहिवाशी अडकले नसल्याची खाञी करुन आगीवर पाण्याचा मारा सुरू केला व सुमारे दहा ते पंधरा मिनिटात आग इतरञ पसरु न देता आगीवर नियंञण मिळवत मोठा धोका टाळला. जवानांच्या सतर्कतेमुळे आग कुठल्याही घरात न पसरल्याने कुठलीही जिवितहानी व वित्तहानी कमी होण्यास मदत झाली. इमारतीत एका घरामधून एक लिकेज असणारा सिलेंडर जवानांनी वेळीच बाहेर घेतल्याने अनर्थ टळला. तळमजल्यावर असणारे सलुनचे दुकान ही सुरक्षित राहिले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र येथील प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, वाहनचालक दिपक कचरे तसेच तांडेल निलेश लोणकर व जवान मोहन सणस, सागर नेवगे, अनुराग पाटील, रामराज बागल यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

rushi