हडपसरमध्ये अफिम बोंड्यांचा चुरा ((पॉपी स्ट्रॉ) जप्त, एक जण अटकेत
पुणे: हडपसरमधील सय्यदनगर, चिंतामणीनगर भागात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ८३ हजार रुपयांचा अफिम बोंड्यांचा चुरा जप्त केला आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सुमेरलाल गिरीधरलाल चौधरी (वय ३०, रा. चिंतामणीनगर, हडपसर; मूळ रा. जोधपूर, राजस्थान) असे आहे.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०२ च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती अॅक्टीवा दुचाकीवर अफिमचा चुरा विक्रीसाठी नेला जात होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून कारवाई करण्यात आली.
संयुक्त पथकाने काळेपडळ पोलीस स्टेशनच्या सहकार्याने सुमेरलाल चौधरी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून ६१५ ग्रॅम अफिम बोंड्यांचा चुरा, अॅक्टीवा दुचाकी, आणि रोख रक्कम असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लटपटे करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त निखील पिंगळे, सहा.पो.आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार प्रमोद कोकणे, राहुल शिंदे, शंकर नेवसे, ओमकार कुंभार, हनुमत कांबळे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, अमोल सरडे, गणेश थोरात विनोद चव्हाण, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख यांनी केली.