Pune Traffic Update : नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी, जाणून घ्या नवे बदल

पुणे: सिंहगड रस्त्यावरील भुमकर चौक अंडरपास ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौक या दरम्यान ‘पिक अवर्स’मध्ये जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत. सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत जड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.

वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या
भुमकर चौक, नऱ्हे, धायरीगाव, मानाजीनगर हा परिसर नव्याने पुणे महापालिकेत समाविष्ट झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर घरे, इमारतींचे बांधकाम तसेच औद्योगिक क्षेत्र असल्याने जड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. अरुंद रस्ता आणि शाळा, महाविद्यालये, रुग्णालये यामुळे ‘पिक अवर्स’दरम्यान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित केले.

जड वाहनांवर निर्बंध, अत्यावश्यक सेवांना सूट
पोलीस उपायुक्त झेंडे यांनी काढलेल्या आदेशानुसार, नमूद वेळेत जड वाहने, अवजड वाहने, मंदगती वाहने आणि त्यांचे पार्किंग यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

स्थानीक नागरिकांना दिलासा
वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशामुळे स्थानिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

rushi