खंडणीच्या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असलेल्या आरोपीला अटक
पुणे : अत्याचार करून खंडणी मागण्याच्या प्रकरणातील पोलिसांच्या रडारवर असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. मानस उर्फ शुभांशु उपेंद्र शर्मा (वय-२४, रा. अप्पर इंदिरा नगर, बसडेपो जवळ, बिबवेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या देखरेखीखाली पथक आरोपींची माहिती काढीत होते. पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व अनिल कुसाळकर यांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला पाहिजे आरोपी नया बाजार, गेट जवळ नंबर ५, मार्केटयार्ड येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवली. मार्केटयार्ड येथील गेट नंबर ५ जवळ त्या व्यक्तीचा शोध घेतला. हा व्यक्ति पळून जाण्याच्या तयारी होता. पोलिसांनी तत्काळ त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली. त्याला नाव तसेच पत्ता विचारला. यावर त्याने त्याचे नाव मानस उर्फ शुभांशु उपेंद्र शर्मा असल्याचे सांगितले. सध्या तो अप्पर इंदिरा नगर, बसडेपो जवळ, बिबवेवाडी येथे राहत असल्याचे त्याने सांगितले. तसेच तो मूळचा करुआ, तहसील सुहागपुर, जिल्हा शॅडोल, राज्य मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती त्याने दिली.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नमूद गुन्ह्याबद्दल त्याच्याकडे विचारपूस करण्यात आली. त्यावर त्याने हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच पुढील कारवाईसाठी त्याला पारगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी ही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार व पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, कुसाळकर, दिलीप गोरे, राऊत यांनी केली.