बनावट कागदपत्रांद्वारे 496 कोटींचा कर बुडवला, जीएसटी कार्यालयाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा
बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने दोन जणांनी 496 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) पुणे विभागाने या प्रकरणात कारवाई केली आहे.
जीएसटी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले दोघे जण राजस्थानातील आहेत.
दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने आरोपींनी चार कंपन्यांची स्थापना केली. बनावट व्यवहार तसेच बनावट कागदपत्रांद्वारे दोघांनी ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’चा लाभ घेतला. बनावट व्यवहारांद्वारे दोघांनी 496 कोटी 27 लाख रुपयांचा कर चुकवेगिरी करून फसवणूक केली.