९ दिवसांची झुंज अपयशी, २१ वर्षीय शिकाऊ पायलट चेष्टा बिश्नोईने घेतला अखेरचा श्वास

पुणे : बारामतीहून भिगवणकडे निघालेल्या शिकाऊ वैमानिकांच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर इतर दोन वैमानिक गंभीर जखमी झाले होते. यामध्ये जखमी झालेली एक तरुणीने नऊ दिवस मृत्यूशी झुंज दिली. तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. अखेर मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तिची आपली जीवनयात्रा संपली.

चेष्टा बिश्नोई (वय २१) असे निधन झालेल्या शिकाऊ पायलट तरुणीचे नाव आहे. तिच्या मृत्यूनंतर या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे.

बारामती येथील रेड बर्ड फ्लाइंग अ‍ॅकेडमीचे चार विद्यार्थ्यी सोमवार, ९ डिसेंबर रोजी पहाटे टाटा हॅरिअर या कार मधून बारामतीकडून भिगवणकडे निघाले होते. कृष्णा मंगल सिंग हा तरुण कार चालवत होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लांमजेवाडीजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी बारामती एमआयडीसीला पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनवर आदळून सुमारे ३०० फूट फरफटत गेली. पाइपलाइनशेजारी असलेल्या झाडांनाही वाहनाचे अवशेष लटकले होते.

या अपघातात दक्षू शर्मा (वय २१, रा. दिल्ली), आदित्य कणसे (वय २२, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर चेष्टा बिश्‍नोई( वय २१, रा. राजस्थान), कृष्णा मंगल सिंग (वय २२, रा. बिहार) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. चेष्टा बिश्नोई हिच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला.

Leave a Reply

rushi