हातात संविधान प्रियांका गांधींनी घेतली खासदारकीची शपथ; रवींद्र चव्हाणांचा मराठी बाणा

प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झाल्या आहेत. संविधानाची प्रत हातात घेवून त्यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी प्रियंका गांधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत संसद भवनामध्ये आल्या. गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसदेत दिसणार आहेत. सोनिया गांधी या राज्यसभेच्या सदस्य […]

1 min read

१ डिसेंबर पासून शासकीय कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई : जिल्हाधिकारी

पुणे : रस्ते अपघातातील मृत्युंचे प्रमाण लक्षात घेता घेता अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता जिल्ह्यात रस्ता सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना कराव्यात; शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आदींनी हेल्मेट वापरून समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम […]

1 min read

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा विजयस्तंभ अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा तसेच येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे […]

1 min read

POLICE PROTECTION WITHDRAWN FOR 30 POLITICIANS IN PUNE

In a recent development, the Pune Police have withdrawn police protection for 30 politicians, including former ministers and MLAs, in the city. This move comes after the Maharashtra Assembly Election 2024. Deputy commissioner of Police (special Branch) Milind Mohite has passed the order which was implemented on Monday. According to reports, the police protection was […]

1 min read

सीमाशुल्क विभागाने जप्त केलेले ६ हजार किलो अमली पदार्थ नष्ट

सीमाशुल्क विभागाने जप्त केलेले ६ हजार किलो अमली पदार्थ नष्ट पुणे: सीमाशुल्क (कस्टम) विभागाने विविध कारवाईत जप्त केलेल्या ६ हजार किलो अमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो लिमिटेड या खाजगी कंपनीच्या च्या भट्टीत हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या कारवाईदरम्यान अमली पदार्थ तस्करीसंबंधी १४ गुन्हे दाखल करण्यात आले […]

1 min read

शिरूरमध्ये ऑनलाईन फसवणुकीत 84.34 लाख रुपयांना गंडा

शिरूर – शिरूर शहरातील एका नोकरदाराला ऑनलाइन फसवणुकीत 84.34 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने वेगवेगळी कारणे देत व आरबीआय खात्याशी लिंक करण्याच्या नावाखाली या व्यक्तीचे पैसे विविध खात्यांवर ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश विनायक धामणकर (वय 43, रा. बागवान नगर, शिरूर, मूळ रा. चिंचाळा […]

1 min read

कोयत्याने वार करुन इस्टेट एजंटचा निर्घुण खुन ! सिंहगड रोडवरील कोल्हेवाडीतील घटना, आर्थिक वादातून झाला प्रकार

पुणे : जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या एजंटावर पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. आर्थिक वादातून हा खुन झाल्याचे सांगण्यात येत आहे. सतीश सुदाम थोपटे (वय ३८, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला) असे खुन झालेल्याचे नाव आहे. सतीश थोपटे याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी […]

1 min read