रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १७ तरुणांची लाखांची फसवणूक

पुणे : रेल्वेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने १७ तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार २०२१ पाासून आतापर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे घडला आहे.

पिंपरी येथील एका ३५ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी राजेश दिनकर राजगुरु (वय ५०, रा. पाथर्डी शिवार, नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपी राजेश राजगुरु याने रेल्वेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर पदावर नोकरी देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून ऑनलाईन आणि रोख स्वरूपात १० लाख रुपये उकळले. आरोपीने बनावट नियुक्तीपत्र तयार करून फिर्यादीच्या ईमेलवर पाठवले आणि ते खरे असल्याचे भासवले. नियुक्तीपत्रानुसार नाशिक येथे पोस्टिंग असल्याचे सांगितले, परंतु प्रत्यक्षात ती नियुक्ती अस्तित्वातच नव्हती. त्यानंतर ते पत्र बनावट असल्याचे त्यांना समजले. याशिवाय, आरोपीने आणखी १७ जणांना अशाच प्रकारे गंडा घालून ५० ते ६० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत.

Leave a Reply

rushi